भरारी पथकांचा वॉच, पर्यवेक्षकांचीही अदलाबदल
अमरावती जिल्ह्यात १९६ परीक्षा केंद्रांवर ३८ हजार ३१७ विद्यार्थी शुक्रवारी दहावीच्या परिक्षेला सामोरे गेले. एकुण परीक्षा केंद्रांपैकी ३४ परीक्षा केंद्रे संवेदनशील असून, या केंद्रावर भरारी तसेच बैठे पथकाचा वॉच राहणार आहे. याशिवाय आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पर्यवेक्षकांचीही अदलाबदल केली गेली. कॉपीमुक्त अभियानात हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात इयत्ता दहावीच्या परीक्षांना शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. अमरावती जिल्ह्यात जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
कॉपीमुक्त अभियान राबविणार, जिल्हाधिकारी, सीईओंचे यंत्रणेला कडक निर्देश
या परीक्षेतही कॉपीमुक्त अभियान राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेच्या सिईओ संजिता महापात्र यांनी दिल्या.
शिक्षण विभाग व इतर यंत्रणांची बैठक घेऊन जिल्हास्तरीय दोन भरारी पथके, तर तालुकास्तरीय पाच भरारी पथके स्थापन केली आहेत.
परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात असणार आहे. दरम्यान, केंद्राच्या बाहेर परीक्षार्थीच्या पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
भरारी पथकाचा वॉच आवश्यक त्या ठिकाणी छायाचित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यानुसार तयारीही करण्यात आली आहे. परीक्षा काळात गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई होईल.

Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com