रॅली, शिबिरे, अभियानातून यंदा वाढला मतदानाचा टक्का

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी प्रत्यक्ष केंद्रात जाऊन मतदान करणे म्हणजेच मतदानाचा टक्का वाढणे महत्त्वाचे आहे. यासाठी निवडणूक विभागाद्वारा वर्षभर विविध कार्यक्रम, शिबिरे, रॅली स्पर्धांसह विविध उपक्रम राबविण्यात आले. यामुळेच लोकसभा निवडणुकीत मतदानाचा तीन दशकात उच्चांकी ६३.६७ टक्का राहिलेला आहे.

मतदार यादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमात केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांद्वारा गृहभेटी देण्यात आल्या. त्यामुळे नवमतदारांच्या नोंदी वाढल्या. शिवाय मृत मतदारांच्या व स्थलांतरित मतदारांच्या नोंदी कमी झाल्याने मतदार यादीमधील अनावश्यक फुगवटा कमी झाला. त्यामुळेही मतदानाचा टक्का वाढला.

६२ टक्के मतदान झाले २०१४ ला यापूर्वी सन २०१४ मध्ये ६२.१६ टक्के मतदान झाले होते. यावेळी १६,१०,२६२ मतदारसंख्या होती, त्यातुलनेत १०,०१,०६३ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला ६० टक्के मतदान झाले २०१९ ला मागच्या म्हणजे २०१९ ला झालेल्या निवडणुकीत ६०.७६ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत १८,३०,५६१ मतदारसंख्या होती.

मतदान वाढविण्यासाठी कसरत रिल्सःमतदार दिनासह इतरही दिन औचित्याने रॅली काढण्यात आल्या. यामध्ये शाळा- महाविद्यालयेही सहभागी झाली होती.

व्हिडीओ रथ :मतदानाचे महत्त्व व मतदारांमध्ये जनजागृतीसाठी निवडणूक विभागाच्या वतीने व्हिडीओ रथ काढण्यात आला. याद्वारे बाजारासह गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करण्यात आली.

सर्व घटकांचे सहकार्य लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर वर्षभर स्वीप उपक्रमाचे माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यामध्ये शाळा,महाविद्यालये, शासकीय कार्यालये, विविध सामाजिक संस्था यासह सर्व घटकातील नागरिकांचे सहकार्य घेण्यात आलेले आहे.प्रवीण देशमुख, नायब तहसीलदार (निवडणूक)

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013577
error: Content is protected !!