
अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यापासून उमेदवाराच्या निवडणूक खर्चाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे उमेदवाराच्या प्रचाराला आवश्यक प्रत्येक वाहनाची परवानगी आरओ किंवा एआरओ यांच्या स्तरावरील नोडल अधिकाऱ्यांकडून घेणे उमेदवारांना बंधनकारक होते. या अवधीत राजकीय पक्षाचे ९ व अपक्ष १४ अशा २३ उमेदवारांनी ‘एक खिडकी’ योजनेतून ५२१ परवानग्या घेतलेल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी विविध कक्षाचे गठण व नोडल अधिकाऱ्यांची नियुक्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी केलेली आहे. प्रचारासाठी वाहने, सभा, मैदान आदी परवानगीच्या अनुषंगाने ‘एक खिडकी’ कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे व या कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे.
त्यांच्या कक्षात विविध कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षातून उमेदवारांच्या रॅली, सभा, मैदान, वाहने, हेलिकॉप्टर यासह अन्य अशा ५२१ पेक्षा अधिक परवानग्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान देण्यात आलेल्या आहे. वाहनाच्या परवानगीसाठी एक खिडकी कक्षाकडे अर्ज करतांना संबंधित वाहनाची आवश्यक ती कागदपत्रे जोडल्यानंतर संबंधित विभागाने त्याची पडताळणी केली व त्यानंतर परवानगी देण्यात आली.
एकूण ५२१ परवानग्या जिल्हाधिकारी कार्यालयात व एआरओ यांच्याकडे स्थापित ‘एक खिडकी’ कक्षामधून निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय पक्षाचे उमेदवार व अपक्ष यांनी प्रचारासाठी ५२१ वाहनांच्या परवानग्या घेतल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रचारासाठी ५२१ वाहनांची परवानगी २४ एप्रिलपर्यंत देण्यात आली आहे. याशिवाय सहा हेलिकॉप्टरलाही परवानगी देण्यात आलेली आहे. निनाद लांडे, नोडल अधिकारी
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






