इन्स्टावरील ओळखीतून शारीरिक अत्याचार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : आजची काही तरुणाई इन्स्टाग्रामच्या आहारी गेली आहे. इन्स्टावरील मेसेज पाहिल्याबरोबर ‘डिसअपिअर’ होत असल्याने कुणी कुणाला काय पाठविले, ते त्या सेंडर आणि रिसिव्हरशिवाय कुणालाही माहीत होत नाही, दिसत नाही. त्यामुळे की काय, अगदी किशोरवयीन मुले मुलीदेखील इन्स्टा हाताळतात. अशाच एका इन्स्टा अकाउंटवरील ओळखीतून एका अल्पवयीन मुलीने सर्वस्व गमावले. मंगरूळ दस्तगीर ठाण्याच्या हद्दीत ४ मे रोजी ती घटना उघड झाली.

१७ वर्षे दोन महिने व ९ दिवस वय असलेल्या पीडितेच्या तक्रारीवरून मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी ४ मे रोजी रात्री ९:१० च्या सुमारास आरोपी विकास राजेंद्र राऊत (२४, रा. वाटखेड, ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध बलात्कार, पोस्को व अॅट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. यातील अल्पवयीन पीडित मुलगी व आरोपी यांची सन २०२२ मध्ये इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. ते दोघे एकमेकांसोबत फोनद्वारे संपर्कात होते. १५ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी आरोपी पीडिताला भेटला. माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशी लग्न करतो, अशी बतावणी त्याने केली. तिला जिल्हा परिषद शाळेच्या मागे नेले. तेथे त्याने तिच्याशी शारीरिक संबंध केले.

तुझी माझी जात भिन्न पीडिता ही अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही त्याने तिच्यावर शारीरिक बळजबरी केली. त्यानंतर पीडिताने आरोपीला लग्नाबाबत वेळोवेळी विचारणा केली. त्यावेळी आपली दोघांची जात भिन्न असल्याने आपण तुझ्याशी लग्न करू शकत नाही, असा पवित्रा त्याने घेतला. आपली लैंगिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने ४ मे रोजी मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013587
error: Content is protected !!