जिल्हाभरात तीन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले, अपहरण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : लोणी, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यात आले. तीनही प्रकरणी ४ मे रोजी अज्ञात दोघांसह एका संशयिताविरुद्ध अपहरणाचे तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

दर्यापूर तालुक्यातील एक १७ वर्षे ११ महिने वयाची मुलगी मावशीकडे राहून ब्युटी पार्लरचा कोर्स करीत आहे. ३ मे रोजी ती लोणी येथे गेली. परंतु, रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने तिचा शोध घेण्यात आला. ती न सापडल्याने ४ मे रोजी रात्री ९.३० च्या सुमारास लोणी टाकळी ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अन्य एक घटना वरूड ठाण्याच्या हद्दीत घडली. एक १४ वर्षीय मुलगी ३ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास कुणालाही न सांगता घरातून निघून गेली. तिचा शोध घेण्यात आला. मात्र, ती मिळून न आल्याने वरूड पोलिस ठाण्यात ४ मे रोजी दुपारी तक्रार नोंदविण्यात आली.

बाहेर गेली, परतली नाही अंजनगाव शहरात राहणारी व आठवीची विद्यार्थिनी असलेली एक मुलगी बाहेरून जाऊन येते म्हणून ४ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास घराबाहेर पडली. उशिरापर्यंत ती परत न आल्याने अखेर रात्री १० नंतर अंजनगाव सुर्जी ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013587
error: Content is protected !!