
अचलपुर मतदान जागृतीसाठी जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण स्वीप उपक्रम राबवण्यात आल्याने अचलपूर मतदारसंघाचा जिल्ह्यात मतदानाबाबत दुसरा क्रमांक लागला आहे.महिलांचा पिंक फोर्स, तिरंगा रॅली, मानवी साखळी, घोषणा, सेल्फी चित्रकला स्पर्धा, पथनाट्य, कौन बनेगा करोडपती स्पर्धा, ब्रँड अॅम्बेसेडर आदी अभिनव प्रयोगामुळे मागील चार लोकसभा निवडणुकांपेक्षा २०२४ लोकसभा निवडणुकीत इतर जिल्ह्यापेक्षा मतदानाची टक्केवारी वाढविण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे अचलपूर मतदारसंघास जिल्ह्यात सर्वाधिक मतदान टक्केवारीत द्वितीय स्थान मिळाले. त्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते चांदूर बाजारच्या तहसीलदार गीतांजली गरड अधिकारीव कर्मचारी हस्ते याबाबत शुक्रवारी पुरस्कार वितरण करण्यात आले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 25






