गुंगीचे औषध देऊन मुलीचे अपहरण

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बेनोडा : शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. ही धक्कादायक घटना सोमवार, ६ मे रोजी बेनोडा ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकाश ऊर्फ राजेश राजा युवनाते (२९) व सचिन माधव वाडिवे (३०) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारीनुसार, पीडित १७ वर्षीय मुलीचे प्रकाश याच्यासोबत बरेच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. या काळात प्रकाशने तिला प्रेमाच्या आणाभाका देत लग्नाचे आमिष दाखविले.

दरम्यान, ३ मे रोजी सायंकाळी पीडित मुलगी ही विहिरीवर पाणी भरण्यास गेली असता सचिनने तिला बाजूच्या शेतात बोलाविले. तेथे त्याने तिला शीतपेय प्यायला दिले. शीतपेय पिल्यावर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर प्रकाश व सचिनने तिचे अपहरण केले. दरम्यान, प्रकाश व सचिनच्या तावडीतून सुटका झाल्यावर ती घरी परतली. तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला. त्यानंतर तिने बेनोडा ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रकाश व सचिनविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013597
error: Content is protected !!