
अचलपूर : विद्यार्थिनीचा वारंवार पाठलाग, मोबाइलवर संभाषण आणि अंगाशी लगट करून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना अचलपूर येथील विदर्भ मिल भागात घडली. याप्रकरणी अचलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
मोहम्मद जाहीद खान ऊर्फ तलवार मोहम्मद बशीर (२१, रा. फर्मानपुरा,अचलपूर), शेख रईस शेख अकिल (२१) व शेख सलीम शेख रफीक (२१, दोघेही रा. जोगीपुरा, अचलपूर) अशी आरोपींची नावे आहेत. ते एकमेकांचे मित्र आहेत. त्यापैकी मोहम्मद जाहीद हा ऑटोरिक्षा चालवितो. विद्यार्थिनीच्या वडिलांची प्रकृती ठीक नसते. त्यामुळे तिला सतत दवाखान्यात वडिलांना न्यावे लागते. ती ऑटोरिक्षात वडिलांना नेत असताना मोहम्मद जाहीद याने तिचा मोबाइल क्रमांक मिळविला व सतत फोन करून तिचा पाठलाग केला. तुझी बहीण भेटली नाही तर मारून टाकू, अशी धमकी तिच्या भावाला देण्यात आली होती. वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने अचलपूर पोलिसांत ७ मेच्या रात्री तक्रार नोंदविली.
आरोपी आणि फिर्यादी वेगवेगळ्या धर्माचे असल्याने घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तिघाही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






