धारणीत पाण्यासाठी दाहीदिशा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

धारणी: तालुक्यात पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. महावितरणतर्फे कमी वीजदाबाचा पुरवठा होत असल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडथळे येऊन पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील जवळपास १४० गावांना याचा परिणाम भोगावा लागत आहे.

धारणी तालुक्यात एकूण १६० गावे आहेत. या सर्व गावांना वीजपुरवठा करण्याची जबाबदारी मध्यप्रदेशातील नेपानगर येथून = १३२ केव्ही वीज वाहून आणणाऱ्या जुटपाणी येथील उपकेंद्रातून केली जाते; परंतु तालुक्यातील धारणी,काढाव, ढाकरमल, गोंडवाडी आणि डाबका या उपकेंद्रांमध्ये जुने ११ केव्ही वीजदाबाचे ट्रान्सफॉर्मर लागले आहेत. त्यामुळे १३२ केव्ही वीज वाहिनीकरिता अधिक योग्य ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे. पवार ट्रालीज तालुक्यात टिटंबा, पाटिया, ढाकणा आणि हरिसाल येथे नवीन उपकेंद्रांची आवश्यकता आहे; परंतु शासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013600
error: Content is protected !!