चिखलक्ष्यातील दोन्ही तलाव आटले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

चिखलदरा : चिखलदरा शहराला पाणी पुरवठा करणारे दोन्ही तलाव आटले असून शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. शिवाय तलावच आटल्याने नौकाविहाराचा व्यवसाय ठप्प पडला असून नौका बाजुला बांधून ठेवण्यात आल्या आहेत.

चिखलदरा शहराला पाणीपुरवठा करणारे मुख्य दोन स्रोत आहेत. एक शंकर तलाव व दुसरा कालापानी तलाव. हे दोन्ही तलाव आजच्या परिस्थितीमध्ये आटले असून दोन्ही तलावांमध्ये थोडे थोडे पाणी आहे. दोन्ही तलावांमध्ये काही दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. सध्या दोन्ही तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. चिखलदरा शहरासाठी प्रशासनाने पाणीपुरवठा करणारी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी माजी नगर उपाध्यक्ष रुपेश चौबे यांनी केली आहे.

चिखलदरा हे विदर्भाचे नंदनवन असून या ठिकाणी लाखोच्या संख्येने पर्यटक येतात. तसेच हे तालुक्याचे ठिकाण असल्याने खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात लोक कार्यालयीन कामासाठी येतात. त्यामुळे पर्यटकांना व स्थानिकांना तसेच येणाऱ्या लोकांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. त्या दृष्टीने प्रशासनामार्फत या ठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या या ठिकाणी स्थानिकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. तेही फक्त पंधरा ते वीस मिनिटेच करण्यात येतो. त्यामुळे चिखलदरा शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. काही ठिकाणी गढूळ पाणी मिळते. शहरात टायफाईड, डायरियासारखे आजार सुद्धा अनेक वेळा उद्भवतात, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण सरने यांनी दिली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013604
error: Content is protected !!