चुरणीत पाण्यासाठी हाहाकार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

चिखलदरा : प्रस्तावित नवीन तालुक्याचे ठिकाण चुरणी येथे मागील दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची भीषण दाहकता आहे. संबंधित ग्रामसेवक बेपत्ता आहे. केवळ एक मे रोजी दोन महिन्यानंतर आले आणि परत निघून गेले. नागरिकांच्या सोयीसाठी राहूल येवले यांनी स्वतःहून स्वखर्चाने टँकर सुरू केले आहे. प्रशासकीय यंत्रणा निद्रिस्त आहे. संतापलेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतचा टॅक्स भरायचा कशासाठी, असा सवाल केला आहे. फक्त पत्नी म्हणून राहू नका, धर्मपत्नी बना चुरणी ग्रामपंचायत तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायत पैकी एक आहे. मार्च महिन्यापासून दरवर्षी चुरणी, बेकाढाणा, चुरणीढाणा येथे भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. पाण्याची पातळी खालावली आहे, त्यामुळे योजना नादुरुस्त आहे. मोटर पंप जळाला असून पाईप फुटले आहे. संबंधित ग्रामसेवक अमरदीप तुरकाने यांचे ग्रामपंचायतवर कुठलेच नियंत्रण नसून सतत अनुपस्थित राहात असल्यामुळे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राहुल येवले यांनी केला आहे. ग्रामपंचायत दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा उन्हाळ्यात करू शकत नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीला कशाचा टॅक्स द्यावा, असा प्रश्नच आता नागरिकांनी केला आहे. याशिवाय चुरणीतील नागरिक मोटारसायकलने हातपंपावरून दररोज पाणी भरत आहेत. चुरणीत नळाला आठ ते दहा दिवसांनी एक वेळा पाणी येते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासन झोपा काढत आहे काय, अशा प्रश्न चुरणीतील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

– ग्रामसेवकावर कारवाई होणार चुरणी येथील ग्रामसेवकासंदर्भात माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल. सर्वांना मुख्यालयात राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. पाणी टंचाईचा मुद्दा प्रामुख्याने प्रथम प्राधान्य देत सोडविण्याचे आदेश आहेत.

जीवनलाल भिलावेकर– खंडविकास अधिकारी पं. स. चिखलदरा

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013604
error: Content is protected !!