
अमरावती: शहरालगतच्या नवीन बायपास ते कोंडेश्वर मंदिर मार्गावर असणाऱ्या शासकीय जमिनवरील जवळपास 61 विटभट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी बुधवारी सकाळी महसुल विभागाचे, मनपाचे पथक, पोलिसांचा ताफा पोहचला. ही कारवाई सुरू होताच भट्टी चालक व कामगार अस्वस्थ झाले. त्यांनी टाहो फोडला. वातावरण तापले होते. कोंडेश्वर मंदिर मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून बर्याच दूर अंतरापर्यंत वीटभट्ट्या आहेत. या परिसरात प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. या भागात अनेक अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत
अमरावती शहरालगतच्या नवीन बायपास ते कोंडेश्वर मंदिर मार्गावर असणाऱ्या शासकीय जमिनवरील जवळपास 61 विटभट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी बुधवारी सकाळी महसुल विभागाचे, मनपाचे पथक, पोलिसांचा ताफा पोहचला. ही कारवाई सुरू होताच भट्टी चालक व कामगार अस्वस्थ झाले. त्यांनी टाहो फोडला. वातावरण तापले होते. कोंडेश्वर मंदिर मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून बर्याच दूर अंतरापर्यंत वीटभट्ट्या आहेत. या परिसरात प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. या भागात अनेक अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत.रस्त्याला लागून असणाऱ्या सुधाकर खोब्रागडे यांची वीटभट्टी सर्वांत आधी उध्वस्त करण्यात आली. एका वीटभट्टी चालकाने एका महसूल अधिकार्यांच्या कानशिलात लगावल्यामुळे वातावरण चिघळले. पोलिसांनी अधिकार्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. एकूण चार भट्ट्या हटविण्यात आल्या. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी वीटभट्ट्या चालकांना 20 मे पर्यंत आपल्या भट्ट्या शासकीय जागेवरून हटवाव्या, अशी अखेरची सूट दिली आहे. भट्ट्यांवर मेळघाटातील दोन हजाराच्यावर आदिवासी मजूर आहेत. Amravati-bricks- Police आजच्या कारवाईने मजुरांच्या झोपड्या उध्वस्त करण्यात आल्या. यामुळे अनेक आदिवासींचे कुटुंब उघड्यावर आलेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






