वादळासह विजेचा कडकडाट, पाऊस

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा,आंबा, संत्र्यांचे वादळासह आलेल्या पावसाने नुकसान केले आहे. कुऱ्हा परिसरात दोन दिवस गेले की उन्हाळा आहे की, पावसाळा हे कळत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

फक्त पत्नी म्हणून राहू नका, धर्मपत्नी बना शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता आलेल्या वादळी वार्यासह आलेल्या पावसाने वातावरण गारवा निर्माण झाला. परंतु, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या शेतात संत्रा, तिळ, आंबा हे पिक आहे. या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. त्याचप्रमाणे सध्या शेतकऱ्यांचा कांदा काढणे सुरू असून आजच्या पावसाने तो भिजला. भिजलेला कांदा फार काळ टिकत नाही. हा कांदा आता कवडीमोल भावात विकल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. झालेल्या नुकसानीची महसुल विभागाने दखल घ्यावी व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अमरावती शहरासह अन्य ठिकाणी हजेरी सांयकाळ च्या सुमारास विखुरलेले ढग एकत्र आल्याने अमरावती शहरासह आजुबाजुच्या भागात वादळासह हलक्या स्वरूपात पाऊस आला. एक तास हे सुरू होते. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहेच. दोन दिवसांपासून कधी उन्ह तर कधी ढगाळ असे वातावरण आहे. पाऊस येण्याची शक्यता आहेच.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013604
error: Content is protected !!