
दर्यापूर : देशासमोर अनेक आव्हाने आहेत. देशसेवेत ब्राम्हण समाज अग्रेसर राहिला असून यापुढेही सुसंस्कारीत पिढी निर्माण करून देश हितासाठी समाजाने प्रयत्नरत राहावे. ब्राम्हण समाजाने दुधात साखर असल्याप्रमाणे इतरांमध्ये मिसळून विस्कटलेली सामाजिक घडी निट करण्याचे कार्य करावे. सोशल मीडियातून काही लोक विघटनवादी विचार पसरवून ब्राम्हण समाजबद्दल अपप्रचार करत समाजात दुही निर्माण करीत आहेत. ब्राम्हण समाजबद्दल धादांत खोटे समज परसवित आहे. याला आळा घालण्यासाठी ब्राम्हणांनी त्यांना कायद्याचा आधार घेऊन धडा शिकवावा, असे आवाहन दर्यापूर ब्राम्हण सभेचे अध्यक्ष भारतकुमार शुक्ला यांनी केले. येवद्यात ‘लव्ह जिहाद’चा संशय दर्यापूर ब्राम्हण सभेद्वारा बनोसा येथील शेतकरी सदन येथे रविवारी स्नेहसंमेलन तथा परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर अ. भा.ब्राम्हण महासंघांचे विदर्भ संघटक रमेश छंगाणी,जिल्हा अध्यक्ष डॉ. शशांक दुबे, रवींद्र गणोरकर,छोटूकाका महाजन, प्रा. एस. के. देशमुख, वर्षा उफाळे, नितीन आंबूलकर, बंडु शर्मा, विक्की शर्मा, डॉ. नमिता तिवारी, डॉ. मनीष दुबे, शैलेंद्र मिश्रा उपस्थित होते. पुढे शुक्ल म्हणले, स्वातंत्र्य पूर्व काळातील संग्रामात ब्राम्हण समाजाचे योगदान अतुल्य आहे. संघटितपणे कोणतेही कार्य केल्यास त्याचे परिणाम उच्च प्रतीचे येतात असल्याने संघटना महत्वाचे आहे.
यावेळी महिलांनी भजन तथा उत्साहगीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमात दर्यापूर तालुक्यातील सर्वशाखीय ब्राम्हण समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक शशांक देशपांडे, संचलन हेमंत पाठक तर आभार चंद्रशेखर कंठे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत गणोरकर, महेश शर्मा, धनंजय जोशी, पराग दंडवते, अॅड. अजिंक्य धर्माधिकारी, आनंद लाखे, कौस्तुभ गणोरकर, शिरीष गणोरकर, दादा गणोरकर प्रमोद जोशी, पराग मोहरीर, पूनम शर्मा यांच्याह दर्यापूर ब्राम्हण सभेच्या कार्यकारिणीने प्रयत्न केले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






