येवद्यात ‘लव्ह जिहाद’चा संशय

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दर्यापूर,: येथील बाभळी भागात वास्तव्य करणाऱ्या 21 वर्षीय विवाहित महिलेला फूस लावून गुन्हेगारी हेतूने पळवून नेल्याची घटना येवदा पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. याबाबत तिच्या पतीसह आई वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे. सदर घटना 9 मे रोजी रात्री येवदा येथे घडली. शोध घेतल्यानंतर महिला न मिळाल्याने 11 मे रोजी तक्रार देण्यात आली आहे. सदर प्रकरणात लव्ह जिहादचा संशय आहे.येवदा येथील मूळ राहणाऱ्या या महिलेचे लग्न दर्यापूर येथील बाभळी भागात झाले. सुखी संसार करणाऱ्या या महिलेला एक वर्षाची लहान मुलगी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या महिलेवर डोळा ठेवून असलेल्या येवदा येथील शे. असीम शे. कलीम (वय 29) याने तीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार येवदा पोलिसात देण्यात आली आहे. सदर महिला आपल्या घरी येवदा येथे साक्षगंध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. याप्रकरणी येवदा पोलिसांनी तातडीने शोध सुरु केला असून शे. असीम याचे संपर्कात असलेल्या काही लोकांना चौकशीसाठी बोलावून तपास सुरु केला आहे. पोलिसांना काही सुगावे लागले असून त्या दिशेने तपास सुरु असला तरी अजून महिलेचा पत्ता लागला नाही. सदर घटना माहिती झाल्याबरोबर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहे. हा प्रकार गुन्हेगारी हेतूने पूर्णपणे ‘लव्ह जिहाद’ असल्याचा आरोप केला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी व समाजबंधवानी पोलिसांची भेट घेत तातडीने कारवाई करून महिलेचा शोध घेण्याची तथा शे. असीम यास शिक्षा करण्याची मागणी केली आहे. नागरिक पोलिस ठाण्यावर धडकले होते. थोटा तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे सदर महिला आपल्या घरून रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन गेली असल्याचे तक्रारीत नमूद आहे. महिलेवर संमोहनाचा प्रयोग झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटना करीत आहे. प्राप्त तक्रार दाखल केली आहे. तपास सुरु केला आहे. याबाबत एलसीबी पथकाची मदत घेतली आहे. शोध सुरु असून वरिष्ठांना याबाबत कळविले असल्याची प्रतिक्रीया येवद्याचे ठाणेदार लक्ष्मण ढेंगळे यांनी दिली.

त्या महिलेचा शोध घ्या : भाजपची मागणी येवदा येथील पळून नेलेल्या युवतीचा युद्ध पातळीवर शोध घ्यावा अशी आग्रही मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात रविवारी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख किरण वानखडे यांना निवेदन देण्यात आले. युवतीचा शोध न लागल्याने भाजपा आक्रमक झाली आहे. नकुल सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदवीधर आघाडीचे श्याम प्रजापती, वडनेरगंगाई येथील ओबीसी मोर्चाचे जिल्हा सचिव विशाल माहुलकर, युवा मोर्चाचे अभिषेक मावळे यांनी निवेदन दिले. पोलिसांनी सकारात्मक उत्तर दिले. यावेळी पवन आपकाजे, प्रशांत कढाने, आशिष प्रजापती, योगेश विजयकर, विक्रांत ढवळे, रोशन इंगळे, गोपाल वानखडे, विवेक भगत आदी उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013604
error: Content is protected !!