
अमरावती : घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता १६ वरती पोहोचली आहे, तर ८८ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे अख्ख्या राज्यातील अनधिकृत होर्डिंग्ज कारवाईच्या कक्षेत आलेत.
१७ एप्रिल २०२३ रोजी पिंपरी- चिंचवड येथे होर्डिंग पडल्याने पाच जण दगावले होते. त्या घटनेनंतरदेखील नगरविकास विभागाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना अनधिकृत होर्डिंग्जच्या निष्कासनाचे आदेश दिले. अमरावती महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी देखील त्या अनुषंगाने बैठक घेतली. तथा शहरातील एकंदरितच होर्डिंगच्या सद्यस्थितीचे वास्तव जाणून घेतले. तथा बाजार परवाना विभागाला कारवाईचे आदेश दिले.
प्रत्येक रस्त्यावर अनधिकृत होर्डिंग शहरातील मनपा मुख्यालयाचा शेजार असो की मोर्शी रोड, शिवाजीनगर भाग, जयस्तंभ असो वा कठोरा नाका, गर्ल्स हायस्कूल चौक अशा बहुतांश चौकांमध्ये अनधिकृत होर्डिंग आहेत.
होर्डिंगमधून पालिकेला शून्य उत्पन्न काही एजन्सीधारक न्यायालयात गेले. तर काहींनी रक्कम थकविली, तर मध्यंतरी शुल्क की कर, हा प्रश्नही उभा • ठाकला. त्यातून मार्ग निघाला. मात्र, मनपाचे उत्पन्न पूर्णतः थांबले. शहराचे विद्रुपीकरण झाले ते वेगळेच. मनपा स्तरावरही काही निर्णय होणे बाकी असल्याने त्यातून येणारा पैसा थांबला.
शहरात ३०० पेक्षा अधिक होर्डिंग अनधिकृत शहरातील अनधिकृत होर्डिंगची संख्या ३०४ च्या आसपास असल्याची माहिती बाजार परवाना विभागाने दिली. पालिकेने अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यास सुरुवात केल्यानंतर संबंधित एजन्सीधारकांनी ते नियमानुकूल करून देण्याची विनंती प्रशासनाला केली. त्यामुळे कारवाई थांबली आहे. मनपाच्या शिरावरदेखील महाकाय होर्डिंग्ज होती. ‘लोकमत’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ती निघाली होती.
वर्षभरापासून कारवाई नाही. अमरावती मनपाने अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यासाठी निविदा प्रक्रियादेखील राबविली. मात्र, १२९ पैकी केवळ २९ होर्डिंग्ज निघाले. वर्षभरापासून कारवाई नाही.
मुंबईत घडले तसे अमरावतीत घडले तर?तसे काही घडल्यास अग्निशमन व्यवस्था व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशिवाय दुसरे काहीही उपलब्ध नाही. मोठी क्रेनदेखील भाड्याने घ्यावी लागते.
महापालिका आयुक्तांनी तातडीने बैठक घेतली. पोलिस आयुक्तालयातदेखील त्यासंदर्भात बुधवारी बैठक झाली. शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज निष्कासन कारवाईला येत्या दोन दिवसांत वेगाने सुरुवात होईल.
उदय चव्हाण, अधीक्षक, बाजार परवाना विभाग
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






