अनधिकृत होर्डिंग तातडीने काढा!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : घाटकोपरच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अमरावती शहरातील सर्व होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, स्टॅबिलिटी सर्टिफिकेटची खात्री करावी, तथा अनधिकृत होर्डिंग तातडीने काढून टाकावेत, या मागणीसाठी राजकीय पक्ष, संघटना सरसावल्या आहेत. ते होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करावी, असेदेखील निवेदनात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी इर्विन चौकातील महाकाय होर्डिंग रात्रीच्या वेळी लगतच्या इमारतीवर कलंडल्याने संभाव्य हानी टळली होती, त्या घटनेचे स्मरण करून देण्यात आले आहे.

माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनीदेखील आयुक्तांच्या नावे पत्र जाहीर केले. प्रहारचे महानगरप्रमुख बंटी रामटेके, भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश सचिव शैलेंद्र मिश्रा, शहर सचिव श्याम पाध्ये यांनी महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना भेटून शहरातील अनधिकृत होर्डिंग तातडीने काढण्याबाबत निवेदन दिले. युवासेनेचे महानगरप्रमुख राहुल माटोडे यांनी रवीनगरातील अनधिकृत होर्डिंगचे फोटो टाकून मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले. पोलिसांनी देखील बैठक घेतली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013604
error: Content is protected !!