बडनेरा शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

बडनेरा : नवी वस्ती परिसरात जीवन प्राधिकरणच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन पार विस्कटले आहे. पाणी सोडण्याची वेळच निश्चित नाही, भरउन्हात, झोपेच्या वेळी पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये जीवन प्राधिकरणाबाबत संतप्त प्रतिक्रिया आहेत. गेल्या दोन दिवसांपासून विविध व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून प्रशासनावर रोष व्यक्त होत आहे. या गंभीर समस्येची तत्काळ दखल न घेतल्यास शहरवासी तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

बडनेरा शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. शहरवासीयांना ते मान्य देखील आहे. तरीदेखील नियोजनशून्य कामामुळे शहरवासीयांना अकारण मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. त्यातल्या त्यात जुन्या व नव्या वस्तीसाठी दोन स्वतंत्र पाण्याच्या टाक्या असताना पाणीपुरवठा सुरळीत का केला जात नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया शहरवासीयांमध्ये आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून नवी वस्ती परिसरातील बहुतांश भागांमध्ये पाणी सोडण्याची निश्चित वेळ जीवन प्राधिकरणकडून पाळली जात नसल्याने लोकांना पाण्याची वाट पाहत  घरीच बसावे लागते आहे. उन्हाळ्यात कूलर तसेच पिण्यासाठी पाणी अधिक लागते. घरोघरी पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. गर्मीने लोक त्रस्त आहेत. अशावेळी पाणी आवश्यक असताना जीवन प्राधिकरणाकडून नाहक नागरिकांना मनस्ताप देण्याचे काम याठिकाणी सुरू आहे. काही भागात दोन दिवसांआड पाणी सोडले जात असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

जीवन प्राधिकरणाला याची गांभीर्याने दखल घ्यावी लागणार आहे. लोकप्रतिनिधीने देखील याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

नवी वस्ती परिसरात जीवन प्राधिकरणाकडून नळाला पाणी सोडण्याचे नियोजन पार ढासळले. उन्हाळ्यात गरजेपेक्षा अधिक पाणी लागते. पाण्याचा पुरवठा ठरलेल्या वेळेतच केला पाहिजे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी.

– मंगेश गाले, सामाजिक कार्यकर्ते.

नवी वस्तीत पाणी सोडण्याची ठरावीक वेळ पाळली जात नसल्याने शहरवासीयांना मनस्ताप होत आहे. मजीप्राने नियोजनावर लक्ष देवून वेळेत पाणीपुरवठा करावा.

सतीश भालेराव, सामाजिक कार्यकर्ते.

ठरलेल्या वेळेतच व्हावा पाणीपुरवठा बडनेरा शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो, त्याची वेळ निश्चित करण्यात आली. मात्र, या संपूर्ण उन्हाळ्यात नवी वस्ती परिसरात नळाला पाणी सोडण्याची वेळच निश्चित नसल्याने लोकांना आपली कामे सोडून पाण्यासाठी अडकून बसावे लागते आहे. कधी सकाळी, भरउन्हात, तर कधी झोपेच्या वेळेस पाण्याचा पुरवठा होत आहे.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013599
error: Content is protected !!