
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामाला आठ दिवसात सुरुवात होत आहे. एखादा जोराचा पाऊस झाल्यानंतर शिवारात पेरणीपूर्व मशागतीची व मार्केटमध्ये बियाणे, खतांच्या विक्रीची धुमशान राहाणार आहे. नेमका शेतकऱ्यांच्या लगबगीचा गैरफायदा घेत बोगस रासायनिक खते, बियाणे शेतकऱ्यांचा माथी मारण्याचे प्रकार दरवर्षी होत असल्याचे दिसून येते. यंदा तालुकास्तरावर १४, जिल्हा व विभाग स्तरावर प्रत्येकी एक अशा १६ पथकांचा वाँच राहणार आहे.
त्यामुळे बोगस निविष्ठा विक्रीचा प्रयत्न झाल्यास संबंधित केंद्राचा परवाना रद्द होईल व प्रसंगी तुरुंगातही जाण्याची वेळ येणार आहे. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी कृषी विभागाद्वारा टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे. शिवाय असा प्रकार निदर्शनात आल्यास शेतकऱ्यांना जवळच्या कृषी कार्यालयाकडे तक्रारदेखील करता येते.
बोगस बियाणे, खते विकाल तर खबरदार कृषी विभागाद्वारा विक्रेत्यांची बैठक घेऊन याविषयी सूचना केल्या आहेत. यानंतरही फसवणूक करण्याचा प्रकार आढळल्यास खपवून घेतला जाणार नाही, असे सांगितले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






