अग्निशमन यंत्र फॅशनसाठी नव्हे, चालविण्याचे प्रशिक्षण कोण देणार ?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : शहरातील अनेक खासगी आस्थापना व शासकीय कार्यालये, दवाखान्यात अग्निशमन यंत्रं लावली गेली आहेत; मात्र ते चालविण्याचे प्रशिक्षण दिले गेले नसल्याने ती यंत्रणा पांढरा हत्ती ठरली आहे. त्यामुळे नजरेच्या टप्प्यात असलेली ती यंत्रणा न वापरता लगेचच महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले जाते. दोन वर्षांपूर्वी राजापेठ येथील हॉटेलमध्ये तसाच प्रकार घडला होता.

एसटी डेपो, बसस्थानके, रेल्वेस्थानक, पेट्रोलपंप, मोठी व्यावसायिक संकुले, खासगी दवाखाने व शासकीय रुग्णालयांसह कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालयांसह सर्व शासकीय कार्यालये व विविध आस्थापनांना अग्निशमन यंत्रे सुस्थितीत ठेवणे बंधनकारक आहे. शासकीय कार्यालयात तर वेळेप्रसंगी आग लागल्यास महत्त्वाचे दस्तऐवज आगीत खाक होण्याची शक्यता असते. शासकीय कार्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रे लावण्यात आली. ती यंत्रे सुस्थितीत असली तरी ती वापरायची कशी, हे माहीत नसल्याने अग्निशमन यंत्रणेशिवाय पर्याय उरत नाही. हाताळणाऱ्यांना प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून वेळोवेळी आग नियंत्रक उपाययोजना राबविल्या जातात.

अग्निशमन यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी कुणाची ?अग्निशमन यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ही संबंधित आस्थापनाधारकाची आहे. महापालिकेचे अधिकारी देखील वेळोवेळी डेमो देत असतात.

उन्हाळ्यात आतापर्यंत आगीच्या ४५ घटना जानेवारी ते मे या पाच महिन्यांत अमरावती महानगरपालिका क्षेत्रात आगीच्या ४५ घटना घडल्या. मनपाच्या अग्निशमन दलाने तातडीने पोहोचून लाखो रुपयांचे नुकसान टाळले.

आम्ही डेमो देतो‘ अग्निशमन विभाग अग्निशामक यंत्राबाबतनेहमीच संस्था, शासकीय कार्यालये व विविध आस्थापनांमध्ये डेमाट्रेशन देत असतो. फायर ऑडिटवेळी देखील ते पाहिले जाते.

अजय पंधरे, अधीक्षक, अग्निशमन

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013597
error: Content is protected !!