साक्षगंधानंतर लैंगिक शोषण केले वराने नियोजित लग्नही मोडले !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : साक्षगंधानंतर वाग्दत्त वधूचे लैंगिक शोषण करून नंतर चक्क विवाहसंबंध तोडून टाकल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. याप्रकरणी ३० वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी २८ मे रोजी सायंकाळी पीडिताचा नियोजित वर सचिन (४१), त्याचे दोन भाऊ राहुल व अतुलसह एका महिलेविरुद्ध बलात्कार, अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. आरोपी सचिनला अटक करण्यात आली. सर्व आरोपी हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील रहिवासी आहेत.

शहरातील एका ३० वर्षीय तरुणीचे ब्रहापुरी येथील सचिन नामक तरुणाशी दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने व पसंतीने लग्न जुळले. गतवर्षी त्यांचे साक्षगंधदेखील झाले. तेव्हापासूनच आरोपी सचिन याने तरुणीकडे शारीरिक संबंधाची मागणी केली.आरोपीने तिचे लैंगिक शोषणदेखील केले. तो फिर्यादीसोबत अश्लील पद्धतीने शारीरिक संबंध करण्याचीदेखील मागणी करीत होता.मात्र, ती त्याला नेहमीच नकार देत होती. त्यावर आपले साक्षगंध झाले आहे. लग्नसुद्धा होईल, अशी बतावणी करून आरोपीने जबरदस्तीने व तिला विश्वासात घेऊन तिचे शारीरिक शोषण केले. त्यामुळे ती प्रचंड घाबरली. त्याच्यासोबत बोलणे व त्याला फोन कॉल करणे देखील टाळत होती.जीवन उद्ध्वस्त तरुणीच्या कौटुंबिक सदस्यांनी सचिन व त्याच्या कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. साक्षगंध झाल्यानंतर लग्न पक्के झाले. आता लग्न तुटले तर दोन्ही बाजूंची बदनामी होईल, त्यामुळे लग्न तोडू नका, अशी विनवणी तिच्या कुटुंबीयांनी केली. मात्र ते न ऐकता आरोपींनी विवाहसंबंध करण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी आपले शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण केल्याची तक्रार पीडितेने नोंदविली.

भाऊ म्हणाले, हे लग्न होणार नाही दरम्यान, फिर्यादी तरुणीचे आई- वडील व भाऊ भेटण्यास गेले असता, सचिनच्या दोन्ही भावांनी – तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाही. तुम्ही साक्षगंधामध्ये आमचा मानपान कैला नाही. तुमची आमच्यासोबत संबंध जोडण्याची लायकी नाही. तुमच्यासारख्या लोकांशी आम्हाला संबंध जोडायचे नाही. आता आम्हाला तुमच्या मुलीबरोबर लग्न करायचे नाही, अशी बतावणी केली.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013598
error: Content is protected !!