
अमरावती : चोरीची दुचाकी विकण्यासाठी ग्राहकाच्या शोधात आलेल्या दुचाकीचोराला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. ३१ मे रोजी त्याला त्याच्या गावातून अटक करण्यात आली. रंजीत राजू पारिसे (वय २४, रा. देवळी, जि. वर्धा) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याने चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा विठोबा येथील यात्रेतून व यवतमाळ जिल्ह्यातील महागाव ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
यवतमाळ येथील श्रवण पचारे यांची दुचाकी सावंगा विठोबा यात्रेदरम्यान ९एप्रिल रोजी चोरीला गेली होती. त्या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, ३१ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार हे टीमसह पेट्रोलिंग करीत असताना ती दुचाकी रेकॉर्डवरील गुन्हेगार रंजित पारिसे याने चोरली. तो विक्रीकरिता ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे त्याला देवळी येथून ताब्यात घेण्यात आले. त्याने सावंगा विठोबासह महागाव हद्दीतूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. एसपी विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात एलसीबीप्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार व मूलचंद भांबूरकर यांनी ही कारवाई केली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






