बालविकास कार्यालयातील अंतरगांव येथील पर्यवेक्षिका यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार व निरोप समारंभ सम्पन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर यवतमाळ : एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय राळेगाव अर्तगत वरध व अंतरगांव येथील पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीमती कल्पना तडस कोसुरकर ह्या नियतवयोमानानुसार सेवा निवृत्त झाल्या. त्यानिमित्ताने अंतरगांव येथील अंगणवाडी केन्दांत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सागर विठाळकर बाल विकास प्रकल्प अधिकारी राळेगाव हे होते तसेच रमेशराव कोसुरकर सर, मोहन भोरे कनिष्ठ सहाय्यक, तसेच सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. याप्रसंगी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी सर्व सेविका मदतनीस भावुक झाल्या होत्या.

सराटी येथुन अंगणवाडी सेविका या पदावर कार्याला सुरूवात करून पर्यवेक्षिका म्हणून वणी तसेच राळेगाव येथे काम केले तसेच काही काळ बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून सुद्धा काम पाहिले, अतिशय सुस्वभावी व सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. सर्वप्रथम आपल्या कामास प्राधान्य देऊन अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले. याप्रसंगी विठाळकर साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे परसोडा येथील अंगणवाडी सेविका श्रीमती शोभा महाजन ह्या सुध्दा वयोमानानुसार सेवा निवृत्त झाल्यामुळे त्यांचा सुध्दा निरोप समारंभ व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, अंगणवाडी सेविका छाया दांडेकर, मुरार,सुचिता मुन, चित्रा घिनमिने,विद्या झोटिंग, कोल्हे,नरड, तिवाडे, ज्योती मेश्राम, दुरबुडे, येसंबरे, येंडे, काटेकर, पारधी, येंगडे, चांभारे, माया मेश्राम, फुलमाळी, घोसले, वादाफळे, झाडे, कांबळे, भगत,सुरेखा पेंदोर, सिमा मेश्राम,तसेच सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या. कार्यक्रम संचालन प्रतिभा मुरार तसेच आभार प्रदर्शन छाया दांडेकर यांनी केले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013603
error: Content is protected !!