
अमरावती : जिल्ह्यातील चिखलदरा या दुर्गम तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशी अत्यंत दयनीय अवस्था असूनही पालकमंत्र्यांनी या गावाकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप माजी मंत्री तथा आ. अॅड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाच्यावतीने अमरावती विभाग दुष्काळ पाहणी दौऱ्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी चिखलदरा तालुक्यातील रविवारी पाहणी दौरा केला.
काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यातील सर्व महसूल विभागांमध्ये दुष्काळ दौरा करण्यात येत आहे. अमरावती विभाग दुष्काळ दौराप्रमुख म्हणून माजी आणि काँग्रेसच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी चिखलदरा तालुक्यातील भगदरी, खडीमल, चुनखडी, तारुबांधा या गावांमध्ये पाहणी दौरा केला. या गावातील दुष्काळग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांनी पाणीटंचाईची माहिती घेतली, यावेळी या परिसरात असलेल्या व्याघ्र प्रकल्पामुळे अनेक पाणीपुरवठा योजनांना परवानगी मिळू शकलेली नाही तसेच पाण्याचे स्रोत खूप खोलवर गेल्याने खडीमल आणि तारुबांधा या गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, या संदर्भात स्थानिक नागरिकांशी चर्चा करून या समस्या शासन दरबारी मांडण्यासंदर्भात आपण नक्कीच कार्यवाही करू, असे आश्वासन अॅड. ठाकूर यांनी यावेळी दिले. राज्यामध्ये दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर होत असताना राज्यात महायुतीचे सरकार मात्र निवडणुकांच्या प्रचारात आणि स्तता च्याच विश्वात मग्न झाले आहे. यांना सामान्य जनतेची काही काळजी नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे चिखलदरा आणि मेळघाटातल्या जनतेला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लात असल्याच्या त्या म्हणाल्या.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






