१.२४ कोटी जीएसटी भरा, अमरावती विद्यापीठाला कौन्सिलची लेखी नोटीस

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडे संलग्नीकरण शुल्कापोटी (अॅफिलेशन फी) १ कोटी २४ लाखांच्या जीएसटीची रक्कम थकीत आहे. त्यामुळे नागपूर येथील जीएसटी कौन्सिलने विद्यापीठाला नोटीस बजावून थकीत रकमेचा भरणा करावा, असे निर्देशित केले आहे. विद्यार्थी संलग्नीकरण शुल्कावर जीएसटी आकारणी होत असल्याने प्रशासन गोंधळून गेले आहे.

नागपूर जीएसटी कार्यालयाने वर्ष २०१७ ते २०२४ या दरम्यान विद्यार्थी संलग्नीकरण शुल्कापोटी जीएसटी थकीत असल्याप्रकरणी अमरावती विद्यापीठाला नोटीस बजावून त्वरेने ही रक्कम अदा करावी, अन्यथा कायदेशीर कारवाईच्या सामोरे जावे लागेल, असे कळविले आहे.

जीएसटीची नोटीस आल्यामुळे हा प्रश्न व्यवस्थापन परिषदेच्या पुढ्यात नेण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. विद्यार्थी संलग्नीकरण शुल्क हे व्यावसायिक नसून या शुल्कातूनच विद्यापीठाचा कारभार चालतो, असा पद्धतीने जीएसटी कौन्सिलसमोर जाण्याची तयारी प्रशासनाने आखली आहे. तत्पूर्वी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य याविषयी कोणता निर्णय घेतात, यावरही बरेच काही अवलंबून आहे. १८ टक्के जीएसटी आकारणी करण्यात आल्यामुळे विद्यापीठात संलग्नीकरण शुल्क जणू व्यावसायिकीकरण झाले तर नाही ना, असाच समज निर्माण झाला आहे.

जीएसटी कौन्सिलकडे दाद मागू : कुलसचिव विद्यापीठात विद्यार्थी संलग्नीकरण शुल्क हा व्यावसाय नाही. हे अगोदर जीएसटी कौन्सिलला पटवून द्यावे लागेल. विद्यापीठ अभ्यासक्रमांना अॅफिलेशन देते म्हणजे नफा कमावते, असे नाही. यातून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती प्रभारी कुलसचिव मंगेश वरखेडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

नागपूर जीएसटी कार्यालयाने २०१७ ते २०२४ या काळातील संलग्नीकरण शुल्काचे जीएसटी थकीत असल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. १८ टक्क्याने जीएसटी आकारणी केली आहे. कायदेशीर उत्तर दिले जाणार आहे.

– डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखाधिकारी, विद्यापीठ

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013604
error: Content is protected !!