
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर पुसद येथील बस स्थानकाच्या आवारातील यात्रा शेडमध्ये दि.३ जुनं २०२४ रोजीच्या सकाळी १० वाजताच्या दरम्यान भिक मागुन खाणाऱ्या वयोवृद्ध इसमाचा मृतदेह आढळला आहे.मृतदेह आढळल्याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली असता शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून सकाळी ११.३० वाजता पंचनामा केला आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव येथे राहणाऱ्या हबीब खान अजीज खान वय ७४ वर्षे याचा मृतदेह आढळला आहे. प्राप्त माहितीनुसार हबीब खान हा पुसदच्या बस स्थानकामध्ये मागून उदरनिर्वाह करीत होता. अशातच यात्रा शेडमधील प्लॅटफॉर्म क्रमांक चार मध्ये सकाळी १० वाजताच्या दरम्यान प्रवाशांना मृतदेह आढळला होता.मृतदेह आढळल्याची माहिती आगारातील अधिकाऱ्यांना देण्यात आली होती.त्यानंतर आगारातील अधिकाऱ्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्याला संपर्क साधून माहिती दिली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राहुल भगत व बद्रीनाथ लिंबुळे या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता त्याच्या खिशामधून त्याचे आधार कार्ड सापडले आहे.त्या आधार कार्डच्या आधारावर त्यांच्या नातेवाईकाला संपर्क केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.त्याचा मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आले असून नातेवाईक आल्यानंतरच शवविच्छेदन केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






