धामणगावातील युवकाचे प्रेत आढळले विहिरीत

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

रिद्धपूर : मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धामणगाव काटपूर येथील बेपत्ता युवकाचे प्रेत शनिवारी नजीकच्या शिवारातील विहिरीत आढळले. तो दोन दिवसांपासून बेपत्ता होता.

पोलिस सूत्रांनुसार, संदीप सुधाकर कनेर (३३, रा. धामणगाव काटपूर) असे मृताचे नाव आहे. त्याचा मृतदेह २ जून रोजी सकाळी ६ च्या सुमारास भाऊराव सुंदरकर यांच्या शेतातील विहिरीत आढळला. याबाबत चुलतभाऊ मंगेश कनेर यांनी शिरखेड पोलिसात फिर्याद नोंदविली. त्यानुसार, संदीप हा दोन

दिवसांपासून घरी आला नव्हता. त्यामुळे त्याच्या मोबाइल क्रमांकावर कॉल करण्यात आले; पण त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा परिसरात शोध घेण्यास प्रारंभ केला. सुंदरकर यांच्या शेतातील विहिरीत पाण्यावर त्याचा मृतदेह आढळला. शिरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला आणि मोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

संदीपच्या आत्महत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. याप्रकरणी मर्ग दाखल करून शिरखेडचे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात जमादार संजय वाघमारे व पोलिस नाईक नितेश वाघ यांनी तपासाला प्रारंभ करण्यात आला आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013604
error: Content is protected !!