
धामणगाव रेल्वे : सार्वजनिक ठिकाणी कुणी हात वर केला किंवा जास्त जवळ आले, तर दुर्गंधी जाणवते. काही माणसांच्या अंगाला उग्र गंध येतो. अगदी महिला, लहान मुलं आणि पुरुष कुणी त्याला अपवाद नाहीत; मात्र शरीराच्या दुर्गंधीकडे दुर्लक्ष करू नका, असे आता तज्ज्ञ सांगू लागले आहेत.
प्रत्येकाच्या घामाला उग्र गंध असतो आणि अनेकदा त्यातून दुर्गंधीही येते. लोकल ट्रेनने, बसने प्रवास करीत असताना कुणी हात वर केला, तर दुर्गंधी येते. कितीही परफ्यूम वापरला तरी हा गंध लपत नाही. घाम येणे ही काही फार भयंकर गोष्ट नाही, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्याला घाम नेमका का येतो, कुठे येतो, हे समजून घ्यायला पाहिजे. डॉक्टरांना विचारून योग्य प्रकारे डीओ वापरला पाहिजे. यात काही घाबरण्यासारखे कारण नाही. फक्त काळजी घेण्याची गरज आहे. जास्त काळ शरीराची दुर्गंधी किंवा वास येत असेल, तर दुर्लक्ष करू नका. तसेच कुणी ही बाब नजरेत आणून दिली, तर वाईट मानू नका.
वाढती उष्णता तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. अशा अनेकांना घाम येतो. त्यामुळेसुद्धा अंगाचा वास येत असल्याचे समोर येत आहे.
काय काळजी घ्याल?उष्ण वातावरणात ज्यांना जास्त घाम येतो, त्यांनी दोनदा अंघोळ केली पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याने अॅटिबॅक्टेरियल साबण वापरावा. अंग नीट पुसावे. काहीजण ओल्या अंगावर परफ्यूम मारतात. डीओ फवारतात. ते त्वचेसाठी चांगले नाही आणि त्याने शरीराची दुर्गंधी कमी होत नाही.
मधुमेह असणाऱ्या अनेकांना घाम येतो. या घामामुळे शरीराला वास येतो, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे काळजी घ्यावी,
थायरॉइडमुळे जास्त थकवा येतो आणि थकव्यामुळे घाम जास्त निघतो. यामुळेसुद्धा वास येत असल्याचे सांगण्यात येते.
घामामुळे बॅक्टेरिया उन्हाळ्यात पाणी कमीप्यायल्याने शरीर डिहायड्रेट होत असते. येणाऱ्या घामामुळे शरीरावरील बॅक्टेरियाची वाढ होते. याला ‘ब्रोम हायड्रोसिस’ असे म्हणतात. मसाल्याचे पदार्थ जास्त खाल्ल्याने शरीराचा वास येतो. –डॉ. अशोक भय्या, (धामणगाव रेल्वे)
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






