नववीत गुण कमी, मुलगा बेपत्ता !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : आई रागावल्याने १५ वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाला. ५ जून रोजी दुपारी मोतीनगर भागात हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून ५ जून रोजी रात्री अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मोतीनगरातील महिलेच्या १५ वर्षीय मुलाला इयत्ता नववीत कमी गुण मिळाले. त्यामुळे नववीत जर एवढे गुण कमी मिळाले, दहावी तर यापेक्षा अधिक कठीण असते, तेव्हा काय करशील, अशी विचारणा करून ती आपल्या मुलावर रागावली. दुपारी १२ च्या सुमारास ती ड्यूटीवर जात असताना तो रडत होता. त्याला समजावत ती ड्यूटीवर निघून गेली. सायंकाळी ती महिला ड्यूटीवरून परतली असता, मुलगा दिसून आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, तो दिसून न आल्याने रात्री ९ च्या सुमारास फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविण्यात आली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013601
error: Content is protected !!