परतवाड्याच्या पाचशेच्या बनावट नोटा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : अमरावतीच्या भाजीबाजार व जयस्तंभ चौकातील बँकेत ५०० रुपयांच्या बनावट नोटा भरण्यात आल्या होत्या. त्या दोन घटनांची शाई वाळते न वाळते तोच परतवाड्यातदेखील तसाच प्रकार उघड झाला आहे. तेथील एका स्मॉल फायनान्स बँकेत ५०० रुपयांच्या ३५ नोटांचा भरणा करण्यात आला. त्या नोटा बनावट आढळून आल्या. याप्रकरणी इसाफ स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापक भास्कर खरात (३०, रा. परतवाडा) यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी ११ जून रोजी रात्री आरोपी शेख दानिश शेख महमूद (२०, रा. अलकरीम कॉलनी, अचलपूर) व राजा खान शेख महमूद खान (३५, रा. बडा ताजबाग, नागपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ऑनलाइन आरोपी शेख दानिश याने ग्राहक सेवा केंद्रातून ट्रान्ॉक्शनद्वारे नद्वारे एजन्सी मालकाच्या खात्यात अनुक्रमे ३५०० व २५ हजार असे एकूण २८ हजार ५०० रुपये ट्रान्सफर केले. संबंधित ग्राहक सेवा केंद्र व एजन्सीच्या मालकाने आरोपीने जमा केलेली रक्कम व अन्य असे एकूण ३२ हजार रुपये इसाफ स्मॉल बँक परतवाडा येथे जमा केली. त्यापैकी ५०० रुपयांच्या ३५ नोटा नकली आढळून आल्या. ७ व ८ सप्टेंबर २०२३ रोजी ती घटना घडली. तपासणीदरम्यान तो प्रकार उघड झाला. हा प्रकार खरात यांनी आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातला. त्यानंतर ११ जून रोजी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली.

 

अमरावतीत उघड झाले दोन प्रकार अमरावतीच्या जयस्तंभ चौक स्थित कोटक महिंद्रा बँकेत ५०० रुपयांच्या आठ बनावट नोटा आढळल्या. १४ मे रोजी दुपारी २:३०च्या सुमारास तो प्रकार उघड झाला होता. बँक ऑफ बडोदाच्या सराफा बाजार शाखेत ५०० रुपयांच्या २० नोटा बनावट असल्याचे आढळून आले होते. १६ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२च्या दरम्यान वेगवेगळ्ळ्या तीन खातेदारांनी भरलेल्या रकमेत त्या २० नोटा बनावट आढळल्याची तक्रार खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!