बडनेऱ्यात वृद्ध महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

बडनेरा : स्थानिक बस स्थानकापासून थोड्याच अंतरावरील मुख्य रस्त्याच्या कडेला एका अज्ञात वाहनाने वृद्ध महिलेस धडक दिल्याने तिचा घटनास्थळी मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास हा अपघात घडला. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कमल रामकृष्ण अढाटे (७५, रा. पापळ वाढोणा, ता. नांदगाव खंडेश्वर)असे अपघातात दगावलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना येथील महावितरण कार्यालयालगत घडली. धडकेत वृद्ध महिलेच्या डोक्याला जबर मार बसला व तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत महिलेचे नातेवाईक गजानन बळवंत दाभणे (रा. अमरावती) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धडक देणाऱ्या वाहनाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही तपासले जात आहेत.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013592
error: Content is protected !!