
अमरावती : शरीराला डौलदार करण्यासाठी अनेक जण जीममध्ये कसरत करतात, तर काही जीम ट्रेनरकडून युवकांना लवकरात लवकर शरीरयष्टी कमविण्यासाठी स्टेरॉइड इंजेक्शन आणि कॅप्सूल घेण्यासाठी गळ घातली जाते. मात्र, त्याचे आरोग्यावर चांगलेच परिणाम होत नाहीत. स्टेरॉइडच्या अतिवापराने हृदयविकारासह मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अॅनाबॉलिक स्टेरॉइडचा जितका लवकर परिणाम दिसून येईल, तितक्या लवकर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. वारंवार वापर केल्याने पुरुष हार्मोन्स आणि प्रजनन यावर प्रतिकूल परिणाम होतो. एवढेच नाही तर पुरुष नपुंसकदेखील होण्याची शक्यता आहे.
फूड सप्लिमेंट्स, स्टेरॉइड कशासाठी?स्टेरॉइड इंजेक्शनचा अतिवापर हा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. अनेक जीममध्ये फूड सप्लिमेंट, स्टेरॉइड दिले जाते.
तज्ज्ञांचाच सल्ला घ्यावा युवकांना कमी वेळेत बॉडी बनविण्यासाठी वाटेल ते करायला ते तयार असतात. मात्र, तसे न करता कधीही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ते केले पाहिजे.
जास्तीचा वापर केल्यास हार्मोन्सवरही परिणाम स्टेरॉइडचा अतिवापर केल्याने त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. याचा पुरुषाच्या हार्मोन्स आणि प्रजननावर प्रतिकूल परिणाम होतो. अनेकदा याचे विपरीत परिणाम म्हणजे पुरुषाला नपुंसकत्वदेखील येऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले.
स्टेरॉइड, फूड सप्लिमेंट धोकादायक स्टेरॉइडमुळे महिलांच्या चेहऱ्यावर केस येणे, युवकांची हाडे ठिसूळ होणे, किडनीवर परिणाम होणे, जननेंद्रिय कमजोर होण्याचे धोके आहेत.हृदयविकार, मूत्रपिंडावरदेखील विपरीत परिणाम होतात. यासाठी काळजी घेतली पाहिजे.
तज्ज्ञ काय म्हणतात….कोणतीही गोष्ट तत्काळ मिळत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते. बॉडी बनवायची म्हटले तरी त्यासाठी आवश्यक वेळ द्यावा लागतो. चांगल्या जीम ट्रेनरच्या मार्गदर्शनात युवकांनी सराव केला पाहिजे. आरोग्यास धोकादायक ठरतील अशा गोष्टींचा वापर करू नये. योग्य मार्गदर्शनाने चांगली बॉडी बनविता येतात.
डॉ. अनिकेत गोंडाणे
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






