
परतवाडा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने १६३ पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांची केंद्रप्रमुखपदी पदोन्नतीकरिता यादी जाहीर करून त्यांना १२ जूनपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु, ही यादी नियमबाह्य असल्याचा आरोप करीत प्रहार शिक्षक संघटनेने यादीवर आक्षेप घेतला. ज्या सहायक शिक्षकांनी उच्च व्यावसायिक पात्रता घेतली आहे, त्यांनादेखील या प्रक्रियेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. तसे न झाल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला.
जिल्ह्यात सुमारे ५२ केंद्रप्रमुखांच्या रिक्त जागांवर पदोन्नतीने पदस्थापना करायची आहे. याकरिता शिक्षण विभागाने पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक यांना पात्र करीत ६ जून रोजी जिल्ह्यातील १६३ जणांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली, तर १२
जूनपर्यंत कागदपत्रे जमा करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानंतर लगेच पदोन्नतीची प्रक्रिया सुरू होईल. परंतु या अंतिम सेवाज्येष्ठता यादीवरच प्रहार शिक्षक संघटनेने आक्षेप घेतला असून प्रसिद्ध केलेली यादी नियमबाह्य असल्याचा आरोप संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान जि.प. च्या शिक्षण विभागाने १६३ पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांची केंद्र प्रमुखपदी पदोन्नतीकरीता यादी जाहीर करून त्यांना १२ जुन पर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु ही यादीच नियमबाह्य असल्याचा आरोप करीत प्रहार शिक्षक संघटनेने विभागीय आयुक्तांकडे यादीवर आक्षेप घेतला होता. अखेर या आक्षेपाची दखल घेत विभागीय आयुक्ताचे आदेशावरून उपायुक्त कवडे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना १४ जून रोजी आयुक्तालयात सर्व माहितीसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






