
वलगाव : वलगाव ते आमला रेल्वे स्थानक रस्त्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्याची स्टेशन प्रबंधकांकडे मागणी करण्यात आली. याप्रसंगी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.वलगाव ते आमला रेल्वे स्थानक मार्ग अतिशय खराब झाला. दुरुस्तीसाठी शासनाचा निधी आला, पण हे काम अजूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकाकडे जाताना अडचणी येत आहेत. रस्त्याचा वापर रेल्वे प्रवासीच करीत नसून त्या भागातील शेतकरीसुद्धा शेतीच्या कामाकरिता करतात. त्यामुळे रोडचे काम त्वरित पूर्ण करावे, या मागणीचे निवेदन भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमुख यांनी शेतकरी व गावकऱ्यांसोबत रेल्वे स्टेशन प्रबंधकांना दिले. वलगाव भाजप शहर अध्यक्ष मनोज खवड, पंकज बारब्दे, संतोष तसरे, मारोतराव इसळ, नीलेश मोरे, स्वराज गाडे, श्रीकांत खवळ, अनिकेत नवरे, मोहन मुंदाने, अनिकेत ढगे, गोकुल कोयेकार, विशाल खवळ आदी उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






