गुरुदेवनगरात दारूमुक्तीचा ठराव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

तिवसा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीत अवैध दारूविक्रीसह वरली मटका जुगार तसेच विविध अवैध धंद्यांना उधाण आले आहे. या निर्विवाद सुरू असलेल्या अवैध धंद्यांनी सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. तेव्हा हे सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावेत, असा ठराव गुरुदेवनगर ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव घेत गाव दारूमुक्त करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. सर्वानुमते घेण्यात आलेला ठराव पोलिस प्रशासन व तहसील प्रशासनाला सोपविण्यात आला आहे.

राष्ट्रसंतांनी भजने व साहित्य यातून व्यसनाधीनतेवर सदोदित कडाडून प्रहार केला होता. आदर्श समाजनिर्मितीचा पाया रचला. व्यसनाधीनतेने समाज कसा लयास जातो, याबाबत त्यांनी प्रबोधन केले तरी काही समाजकंटक येथील वातावरण दूषित करीत आहेत.

त्यामुळे ग्रामपंचायतने समाजपयोगी निर्णय घेऊन प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. आता अवैध धंद्यांवर पोलिस प्रशासन कधी कारवाई करणार, याकडे ग्रामवासीयांचे लक्ष लागले आहे.

गुरुदेवनगर है दारूमुक्त करण्यात यावे,यासाठी ग्रामपंचायतकडून निवेदन व ठरावाची प्रत प्राप्त झाली आहे. लवकरच या गैरप्रकाराला आळा घालण्यात येईल.

– सुरेश म्हस्के, ठाणेदार, तिवसा

गावात निव्वळ विकासकामे करूनच जमत नाही, तर समाजाची सुरक्षा व स्वास्थ्यही महत्त्वाचे आहे. त्याअनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

– वैशाली धुमोने, सरपंच, गुरुदेवनगर.

ग्रामपंचायतने घेतलेला ठराव खरोखर स्तुत्य आहे. आज तरुणाईला व्यसनाचे वेड लागले आहे. किमान भावी पिढी या विळख्यात गुरफटणार नाही.

– अरविंद राठोड, ग्रामगीता प्रचारक.

 

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013602
error: Content is protected !!