प्रेमीयुगुलांना अश्लील चाळे करण्यासाठी केबिन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : प्रेमीयुगुलांना अश्लील चाळ्यांसाठी ३०० रुपये तासाप्रमाणे केबिन उपलब्ध करून देणाऱ्या कठोरा मार्गावरील एका कॅफेवर गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी धाड टाकली. या कारवाईत कॅफेमालकासह एका कामगाराला ताब्यात घेण्यात आले.

अमरावती शहरात अश्लील कृत्यासाठी कॅफेत केबिन उपलब्ध करण्याची स्पर्धाच लागली आहे. कठोरा मार्गावरील फ्रोझन डिलाईट कॅफेमध्ये प्रेमीयुगुलांना तासाप्रमाणे पैसे आकारून अश्लील कृत्यासाठी केबिन उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट-२ ला मिळाली. या माहितीच्या आधारावर सहायक पोलीस निरीक्षक महेशकुमार इंगोले व त्यांच्या पथकाने या कॅफेवर धाड टाकली. त्यावेळी कॅफेमध्ये तयार करण्यात आलेल्या केबिनमध्ये काही तरुण-तरुणी हे अश्लील कृत्य करीत असताना दिसून आले. त्यामुळे कॅफेमालक दीप किशोर चितोंडे (२८ रा. पोटे टाऊनशिप) व तेथे काम करणारा प्रेम संदीप थोरात (१९, रा. विलासनगर) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट-२ चे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक महेशकुमार इंगोले, पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, दीपक सुंदरकर, गजानन ठेवले, मंगेश शिंदे, संग्राम भोजने, नईम बेग, चेतन कराडे, योगेश पवार, नीलेश वंजारी, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले, वर्षा घोंगडे, संदीप खंडारे यांनी ही कारवाई केली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013610
error: Content is protected !!