

संजय लक्ष्मणराव कारवटकर
विदर्भ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य
मु पो धानोरा ता राळेगाव
जिल्हा यवतमाळ
7499602440
विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर राजस्थानी सावकाराला राजकीय एका पुढाऱ्यांचे पाठबळ तर लंबु नामक सावकाराचे संबंधक तालुक्यात सक्रिय तर पोलिस प्रशासन त्या लंबु वर्ती कारवाई करेल काय?* गुठका तस्करी, मटका, अवैध्य रेती तस्करी, अवैध्य दारू आणि यासह अनेक अवैध व्यवसायांमुळे बदनाम झालेल्या झरी तालुक्या मध्ये आता राजस्थान येथील लंबु नामक खासगी सावकारांच्या मुजोरीने नव्याने भर घातली आहे. हे अर्थातच पोलिस आणि राजकीय बळामुळेच शक्य झाले आहे. धडधडीतपणे दिवसा ढवळ्या गोरगरिबांची पिळवणूक करणारी ही खासगी सावकारी म्हणजे झरी तालुक्याला लागलेला एक मोठा कलंक असूनही याची कसलीही खंत अथवा खेद येथील एका राजकीय पुढार्याला नाहीच किंबहुना तालुक्यातील अनेक भुक्कड गोष्टींवर समाज माध्यमातून वारेमाप चर्चा करणाऱ्या सामाजिक संघटनानाही याचे भान नाही. वास्तविक सामाजिक संघटनांच्या पाठपुराव्यामुळे पोलिसांनी एखादी ठोस कारवाई केली तर कायमची बंद होऊ शकणारी ही खासगी सावकारी सध्या त्या राजकीय पुढाऱ्या मुळे दिवसागणिक वाढते आहे.तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हजारो कुटुंबे देशोधडीस लागली आहेत, अनेक जण कायमचे परागंदा झाले आहेत. तरीही येथील पोलिस यंत्रणा जुजबी कारवायांवर समाधान मानते आणि सामाजिक संघटनाही काहीच वेगळे घडले नसल्याच्या आविर्भावात गप्प राहतात. इथेच सगळे चुकते आहे. येथील कोणी राजकारणी याबाबत एक चकार शब्द बोलत नाही कारण हे खासगी सावकारच काही राजकीय पुढाऱ्यांचे भक्कम आधार स्तंभ आहेत.
सावकारी बाबतीत वारंवार पोलिस यंत्रणा तक्रारी दाखल करण्याचे आवाहन करते तरीही खासगी सावकारीमुळे पिचलेला एकही तक्रारदार पुढे येत नाही. याचा अर्थ नेमका काय समजायचा? काही तक्रारदार पोलिस कार्यालयाला तक्रार दाखल करायला गेले तर तक्रार दाखल होण्या आधीच तो राजकीय पुढारी पोलिस कार्यालयात फोन करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच खासगी सावकारी म्हणजे, काही राजकीय पुढारी व पोलिसांच्या अतिरिक्त उत्पन्नाचे एक मोठे साधनच बनले आहे.गेल्या सात ते आठ वर्षांत लंबु नामक राजस्थानी खासगी सावकाराचे स्तोम तालुक्यात केवळ पोलिस आणि राजकीय त्या पुढाऱ्याच्या यंत्रणेमुळे वाढले आहे. गोरगरीब गरजू आदिवासी शेतकऱ्यांना मासिक व्याजाने पैसे देऊन त्यांची पिळवणूक करणारी एक मोठी यंत्रणा सध्या झरी तालुक्या मध्ये वाढली आहे तर विविध टोळक्यांच्या स्वरूपात सक्रिय आहे. सहाजिकच राजस्थान येथील लंबु नामक सावकार तालुक्या मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध्य सावकारी करत असल्याची माहिती पोलिस यंत्रणांना नसणे हे कदापि अशक्य आहे. याच खासगी सावकारीस काही राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ तर आहे परंतु आता सध्या लंबु नामक सावकाराचे काही संबंधक सुद्धा मुकुटबन या शहरात वास्तव्यास राहत असून तालुक्याचे ठिकाण असलेले झरी या शहरातून हे सर्व अवैध्य सावकारी चा धंदा चालवत असून लंबु व त्याच्या सर्व राजस्थानी संबंधका वर्ती पोलिस प्रशासन कारवाई करेल काय याच्या कडे तालुक्याचे लक्ष लागून आहे
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






