
अमरावती : जिल्ह्यातील आर्थिक अथवा अन्य कारणांमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी गत महिन्यात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत ४१ शाळाबाह्य मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आला.
शहर व ग्रामीण भागातील विविध वाड्या, वस्त्या, झोपडपट्टी, आणि स्थलांतरित लोकांच्या वस्त्यांमध्ये ५ ते २० जुलै पर्यत राबविलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. या अहवाला नुसार शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात आला. यामध्ये शहर ग्रामीण भागातील ४१ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेशित कळेले आहे. यामध्ये पाच तालुक्यात शाळाबाह्य मुले आढळून आली. यात इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये २३, सहावी ते आठवीचे ८ नववी ते बारावी मधील १० असे ४१ विद्यार्थी शाळाबाह्य सर्वेक्षणात आढळून आलेत. मोहिमेंतर्गत मनपा क्षेत्रात १४ तर ग्रामीणमध्ये वरूड तालुक्यात ६, धारणी तालुक्यात १०, अंजनगाव सुजी तालुक्यात २, अचलपूर ९, भातकुली ३, याप्रमाणे ४२ शाळाबाह्य मुले आढळून आली.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






