
अमरावती : नगरविकास विभागाने गट ब संवर्गातील परिविक्षाधिन मुख्याधिकारी सुभाष जानोरे व दीपिका गायकवाड या दोन अधिकाऱ्यांना अमरावती महापालिकेत सहायक आयुक्त अशी पदस्थापना दिली होती. ते २३ ऑगस्ट रोजी महापालिकेत रूजू देखील झाले. यातील सुभाष जानोरे यांच्याकडे भाजीबाजार झोन क्रमांक ५ च्या तर, गायकवाड यांच्याकडे दस्तूरनगर झोन क्रमांक ३ च्या सहायक आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महापालिकेत सहायक आयुक्तांची आठ पदे मंजूर असताना शासनाचा वा पदोन्नतीने एकही अधिकारी कार्यरत नाही. त्यामुळे पाच झोनची जबाबदारी सहायक अभियंता, जनसंपर्क अधिकारी व समाज विकास अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. दरम्यान, सांख्यिकी अधिकारी योगेश पिठे यांची उपायुक्त पदी पदोन्नती झाल्याने दस्तुरनगर झोनचा अतिरिक्त कार्यभार रामपुरी कॅम्प झोनचे प्रभारी सहायक आयुक्त तथा कनिष्ट अभियंता नंदकिशोर तिखिले यांच्याकडे देण्यात आला होता. आता तेथील जबाबदारी दीपिका गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. उपअभियंता तौसिफ काझी निवृत्त झाल्याने भाजीबाजार झोनच्या सहायक आयुक्तपदाची जबाबदारी तेथील कनिष्ठ अभियंता विवेक देशमुख यांच्याकडे देण्यात आली होती. देशमुख यांना आता सहायक आयुक्तपदाहून कार्यमुक्त करण्यात आले. त्यांच्याकडे भाजीबाजार झोनच्या उपअभियंता पदाचा प्रभार जैसे थे राहील. रामपुरी कॅम्पचे सहायक आयुक्तपद नंदकिशोर तिखिले यांच्याकडे, राजापेठ झोनची जबाबदारी पीआरओ भुषण पुसतकर यांच्याकडे आहे. समाजविकास अधिकारी धनंजय शिंदे हे बडनेरा झोनचे सहायक आयुक्त आहेत.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






