मुलीचा विनयभंग; आरोपीस एक वर्ष शिक्षा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अमरावती : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने २६ ऑगस्ट रोजी एक वर्ष कारावास व १ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना ३ जून २०२२ रोजी कोतवाली ठाण्याच्या हद्दीत घडली होती. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे यांच्या न्यायालयाने तो निर्णय दिला.

शेख मुजम्मील उर्फ राजा खान (२८) रा. गुलिस्तानगर क्रमांक २ असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शेख मुजम्मील हा मुलीच्या घराजवळ बांधकामावर होता. त्यावेळी तो तिच्याकडे बघून बोलण्याचा प्रयत्न करीत होता. पाठलाग करून तिला इशारे करीत होता. याबाबत तिने आईला सांगितले होते. ३ जून २०२२ रोजी सकाळी पीडित ही मैत्रिणीसोबत शिकवणी वर्गाला जात होती. त्यावेळी आरोपीने पाठलाग करून तिला अडविण्याचा प्रयत्न केला. तो तिच्या शिकवणी वर्गापर्यंत पोहोचला. घाबरलेल्या मुलीने घरी पोहोचताच याबाबत आईला माहिती दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला. एपीआय प्रशाली काळे यांनी आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. सरकारतर्फे सोनाली एस. क्षीरसागर यांनी युक्तिवाद केला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013600
error: Content is protected !!