
अमरावती : भारतीय मजदूर संघाचे जिल्ह्याचे त्रैवार्षिक अधिवेशन नरसम्मा हिरय्या येथील सभागृहात पार पडले. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र दोड, उद्घाटक म्हणून गजानन गटलेवार, चंद्रकांत खानझोडे उपस्थित होते. या अधिवेशनाच्या सुरुवातीला रूपेश राऊत यांनी प्रास्ताविक भाषणातून जिल्ह्याचा तीन वर्षांचा आढावा सादर केला. अध्यक्षीय भाषणात राजेंद्र दोड यांनी भारतीय मजदूर संघाला ७० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त नियोजित कार्यक्रमाविषयी माहिती दिली. तर चंद्रकांत खानझोडे यांनी अचलपूर येथील बंद पडलेल्या फिनले मिल संदर्भातील आंदोलनाविषयी माहिती दिली. या अधिवेशनामध्ये उपअभियंता दीपक भोंडे, महाराष्ट्र बँकेतील अधिकारी – सुनील राजकारणे यांचा गौरव करण्यात आला. तसेच या अधिवेशनामध्ये फिनले मिल सुरू करण्यात यावी, जुनी पेन्शन स्कीम सुरू करण्यात यावी, समान वेतन कायदा याविषयी ठराव पारीत करण्यात आले.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com






