अॅपद्वारे ‘खड्डेमुक्त योजना’, ‘बी अॅण्ड सी’चा उपक्रम

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : खड्डेमुक्त योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने ‘पीसीआरएस’ हे अॅप सुरू केले आहे. या माध्यमातून राज्याला खड्डेमुक्त करण्याचा सरकारचा मानस आहे. सामान्य माणसांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी ‘पीसीआरएस’ हा अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घ्यावा. कोणत्याही नागरिकांची खड्यांविषयी तक्रार असल्यास त्याने आधी खड्यांचा फोटो काढावा व त्यानंतर हा फोटो प्रणालीमध्ये अपलोड करावा. प्रणालीमध्ये आलेल्या खड्डा हा ७२ तासांत दुरुस्त करून भरण्यात यावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आहेत. त्याअनुषंगाने सार्वजनिक अमरावतीच्या बांधकाम विभागाने ‘खड्डेमुक्त योजना’ अंमलबजावणीची तयारी चालविली आहे. पाऊस अथवा काही कारणामुळे रस्त्यावर खड्डे पडल्याचे दिसून आल्यास नागरिकांनी या खड्याचे फोटो अॅपद्वारे प्रणालीवर अपलोड करावे आणि त्याचा त्वरित फोटो काढून अपलोड करून संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून द्यावा, त्यामुळे रस्त्यावरील खड्डे भरले जाणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी होईल किंवा होणार नाही. अॅपवर आलेले खड्ड्यांचे फोटो त्वरित भरावेत, असे निर्देश अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गिरीश जोशी यांनी यंत्रणेला दिले आहेत. नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये हे अॅप डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन अमरावतीचे उपअभियंता तुषार काळे यांनी केले आहे.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013599
error: Content is protected !!