४७८ अंगणवाडी केंद्रात बालकांना विशेष आहार अन् औषधोपचार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

मेळघाटातील कुपोषण आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत वेगवेगळ्या उपाययोजना राबविले जातात. महिला बाल विकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. मेळघाटातील कमी वजनांची बालके तीव्र कमी वजनात जाऊ नयेत आणि कुपोषित होऊ नयेत म्हणून महिला बाल विकास विभागामार्फत प्रत्येक अंगणवाडी केंद्रात ग्राम बालविकास केंद्र सुरू केली आहेत. यामध्ये कमी वजनांची बालके दाखल केलेली आहेत मेळघाटात एकूण ४७८ अंगणवाडी केंद्रे आहेत. यामध्ये शून्य ते सहा वर्षे वयोगटातील जवळपास ४० हजार बालके येतात. काही बालके जन्मताच कमी वजनांचीकिंवा आरोग्याच्या विविध कारणास्तव कमी वजनांची असतात. हीच बालके पुढे कुपोषित बालकांमध्ये परावर्तित होतात. त्यामुळे अशा बालकांची काळजी घेतली तर ही बालकी कुपोषणात जाणार नाहीत यासाठी धारणी तालुक्यातील १८०० कमी वजनांच्या बालकांवर उपचार केले जात आहेत. बालके या उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. प्रत्येक बालकाचे वजन ३०० ते ५०० ग्रॅमची वाढ झालीआहे. या दाखल बालकांना योग्य आहार औषधी दिला जात असल्यामुळे त्यांच्या वजनात सकारात्मक वाढ होत असल्याचे डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके यांनी सांगितले.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013598
error: Content is protected !!