सिलेंडरचा काळा बाजार वडकी पोलीसांनी केला उघड.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

संजय लक्ष्मणराव कारवटकर
विदर्भ प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य
मु पो धानोरा ता राळेगाव
जिल्हा यवतमाळ
7499602440

 

चक्क एच.पी.गॅसच्या ट्रॅकर मधून सुरू होती चोरी.
दोन आरोपींसह ६४ व्यावसायीक सिलिंडर व दोन वाहने जप्त.

विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर राष्ट्रीय महामार्गावरील दहेगांव फाट्याजवळील एका धाब्यावर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला सिलेंडरचा काळा बाजार वडकी पोलीसांनी अखेर उघडकीस आणला आहे.चक्क एच.पी.गॅस कंपनीच्या ट्रॅंकर मधून व्यावसायीक सिलिंडर भरले जात होते.वडकी पोलीसांनी धाब्यावर अचानक धाड टाकून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन ६४ व्यवसायिक सिलेंडरे दोन वाहने व अन्य साहित्य जप्त केले.हि कारवाई २७ आॅगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता दरम्यान करण्यात आली.

वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दहेगाव फाट्याजवळील विरतेजा या धाब्याचे मागे एच.पी.गॅस कंपनीच्या ट्रॅंकर मधून गॅसची चोरी करून सिलेंडर भरत असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांना मिळाली त्या माहितीच्या आधारे धाब्यावर पोलीसांनी अचानक छापा टाकला असता त्या ठिकाणी काही जण एम.एच.४० बी.जी.५९७४ क्रमांकाच्या गॅस टँकर मधून टँकर कॅप्सुलचे वाॅल पैकी मधल्या वाॅल मधून पाच नोझल असलेल्या एका लोखंडी पाईपच्या सहायाने रिकामे व्यवसायिक सिलेंडर भरताना आढळून आले.तसेच भरलेले सिलेंडर बाजूला उभी असलेल्या एम.एच.१२ जि.टी.१५८४ या क्रमांकाच्या वाहनामध्ये टाकतांना दिसुन आले.या प्रकरणी पोलिसांनी धाबा चालक श्रवण कुमार राजूराम (२८) ग्राम पल्ली जि.जोधपूर राजस्थान व शिवबहादुर सिंग रामलखन सिंग (४९) ग्राम नकटी पवैया जि.सतना मध्यप्रदेश यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला असून त्यांचे कडून एक टँकर, एक टाटा मोटर्स कंपनीचे ४०७, निळ्या रंगाची ३९ व्यवसायिक सिलेंडर,२५ खाली सिलेंडर, लोखंडी नोझल असलेलले प्लॅस्टिक पाईप,वजन काटे व एक लोखंडी पाना असा जवळपास ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.हि कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनात वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे,आकाश कुदूसे, विनोद नागरगोजे यांनी पार पाडली.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013592
error: Content is protected !!