
-सचिन इंगळे (प्रतिनिधी) : दर्यापूर अंजनगाव सुर्जी :
महिलांवर सातत्याने होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात निषेध करण्यात येत असून माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंजूर केलेल्या शक्ती कायद्याची अंमल बजावणी करण्याबाबत अंजनगाव सुर्जी येथे शिवसेनेच्या वतीने ( उबाठा गट) स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे. हया मोहीमेचे आयोजन शिवसैनिक गजानन लवटे यांनी केले होते.तरी शिवसेना अंजनगाव सुर्जीच्या वतीने नागरिकांनी व शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात स्वाक्षरी मोहीम मध्ये सहभाग नोंदवला.हयावेळी समस्त नागरिक तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com
Post Views: 52






