केवळ राजकारण : महाविकास आघाडीविरोधात भाजपचे आंदोलन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

अमरावती : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने राज्यभरात महाविकास आघाडी कडून सत्ताधारी महायुती सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. परंतु, आघाडीतील नेते हे फक्त या घटनेचे राजकारण करीत असून त्याला प्रतिउत्तर म्हणून भाजपने शहरातील राजकमल चौकात महाविकास आघाडी विरोधात आंदोलन केले.

महाविकास आघाडीकडून सुरू असलेले आंदोलन हे राजकीय हेतूने सुरू असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.त्यामुळे मविआच्या या आंदोलनाला भाजपने अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलनाने उत्तर दिले. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवून यावेळी महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मविआ नेत्यांचा निषेध नोंदवला. आंदोलनात खासदार अनिल बोंडे, माजी आमदार रमेश बुंदिले, भाजप युवा मोर्चाचे बादल कुलकर्णी, अजिंक्य वानखडे, प्रवीण तायडे, गोपाल चंदन, प्रणीत सोनी, हरीष साऊरकरर, प्रवीण रुद्रकर, तुषार चौधरी, श्याम साहू, सौरभ पिंपळकर, आदींसह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013605
error: Content is protected !!