गाडगेनगर हद्दीत तासाभराच्या फरकाने दोन चेनस्नॅचिंग

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : तासाभराच्या फरकाने गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी चेनस्नॅचिंगच्या दोन घटना घडल्या. दोन दुचाकीहून आलेल्या अज्ञात चार भामट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सुमारे ३०.५८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवार, ८ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्री दोन स्वतंत्र एफआयआर नोंदविले.

यातील पहिली घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास कठोरा नाका रोडवरील शिवार्पण कॉलनीतील एका मेडिकलजवळ घडली. फिर्यादी महिला या त्यांच्या दोन बहिणींसह दिवाळीनिमित्त शिवार्पण कॉलनी येथील त्यांच्या मावशीकडे आल्या होत्या. दरम्यान शुक्रवारी त्या तिघीही अंबादेवीच्या दर्शनाला गेल्या. दर्शन घेऊन शिवार्पण कॉलनीत परतण्यासाठी त्यांनी ऑटोरिक्षा केली. ती ऑटोरिक्षा शिवार्पण कॉलनीत थांबली. तिघीही खाली उतरल्या. पैकी एक बहीण काही सामान घेण्याकरिता समोरील दुकानात गेली. त्यामुळे फिर्यादी महिला या आपल्या अन्य एका बहिणींसह तेथे उभ्या असताना एका दुचाकीवर दोन इसम तोंडाला रूमाल बांधून त्यांच्याजवळ आले. काही क्षणातच त्यापैकी एकाने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील ७८ हजार रुपये किमतीचे १०.५८० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी ८ नोव्हेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास गुन्हा दाखल केला.

 

मंदिरात परतताना घडली घटना चेनस्नॅचिंगची दुसरी घटना प्रेरणा कॉलनी गार्डनसमोर ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास घडली. त्याच भागातील रहिवासी असलेली एक महिला मंदिरात हरिपाठ करून घरी परतत होत्या. त्या किरकटे यांच्या घरासमोर उभ्या असताना तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील १.५६ लाख रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास गुन्हा दाखल केला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!