
पूर्णानगर : नजीकच्या पोहरा पूर्णा येथील मनोरुग्ण युवकाला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री १ च्या सुमारास तो रुग्णालयातून बेपत्ता झाल्याची तक्रार युवकाच्या आईने शहर कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली. ४ नोव्हेंबर रोजी हा घटनाक्रम घडला.
पोलिस सूत्रांनुसार, आसेगाव पूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोहरा पूर्णा येथील रहिवासी रवींद्र मधुकर बोबडे (३०) हा मनोरुग्ण आहे. त्याला ४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तो वॉर्डातील रुग्णांना त्रास देत असल्याने तेथील नागरिक व ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला व्हरांड्यात बसविले. तेथून कर्मचाऱ्यांना चकमा देऊन रात्री १ वाजता तो तिथून बेपत्ता झाला. सकाळी सोबत असलेल्या आईने व्हरांड्यामध्ये रवींद्रला बघण्याकरिता गेली असता, तो तेथे आढळून आला नाही. यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. त्याच्या मनगटावर ‘रवींद्र अवधूत प्रसन्न’ असे नाव गोंदले आहे.
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







