
अमरावती/धारणी: रब्बी हंगामाला आता सुरुवात झाली आहे. यावर्षी जमिनीत वाढलेली आर्द्रता जिरायती हरभऱ्याला पोषक आहे. शिवाय भूजलस्तर वाढल्याने सिंचनाला पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी किमान ५० हजार हेक्टरमध्ये क्षेत्रवाढ होण्याची शक्यता असली तरी सध्या वातावरणात थंडी कमी असल्याने रब्बीच्या पेरण्या लांबल्या आहेत.
रब्बी ज्वारीच्या क्षेत्रातही मोठी वाढ होत आहे. यावर्षी १७१० हेक्टरमध्ये ज्वारी क्षेत्र राहणार आहे. शिवाय मका २,४१० हेक्टरमध्ये राहणार आहे. यावर्षी पावसाळ्यात ११ तालुक्यांत पावसाने सरासरी पार केली. त्यामुळे जमिनीमध्ये पाण्याचे पुनर्भरण झाल्याने भूजलपातळी वाढली, शिवाय सिंचन प्रकल्पातही पूर्ण संचय आहे.
त्यामुळे रब्बीसाठी पाण्याचे आर्वतन सोडण्यात येणार असल्याने जिरायती क्षेत्रातील शेतकऱ्यांना गहू व हरभरा यासाठी याचा लाभ मिळणार आहे.
… असे लागणार बियाणे
बियाणे बदलानुसार गव्हासाठी १९,७४९ क्चिटल, रब्बी ज्वारी ४५ क्चेिटल, हरभरा ३९,०४० क्विंटल, मका ३८६ क्विंटल व इतर १३१ असे एकूण ५९,३५१ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यामध्ये ‘महाबीज’द्वारा २२,२०६, राबिनी ५४०० व खासगी ३१,७४५ क्चिटल बियाणे उपलब्ध होणार आहे.
राहणार उच्चांकी क्षेत्र या वर्षीच्या हंगामात गव्हाचे ५३,३७७ व हरभऱ्याचे १,५७,७३८ हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ४० ते ५० हजार हेक्टरने जास्त आहे
Author: Z 24 News
z24news.dreamhosters.com







