प्रीती बंड यांचा ‘जनशक्ती विरुद्ध धनशक्ती’चा लढा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

अमरावती : गत अनेक वर्षांपासून बडनेरा मतदारसंघातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना नेत्या म्हणून कार्यरत असलेल्या अत्यंत सामान्य परिस्थितीमध्ये जनसेवेला प्राधान्य देणाऱ्या प्रीती संजय बंड यांनी बडनेरा मतदारसंघात शुक्रवारी आक्रमकपणे प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रीती बंड यांनी ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती’ असण्याचा हुंकार दिल्याने या प्रचाराने विरोधी उमेदवारांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गेल्या ४० वर्षांपासून निष्ठावंत असलेल्या बंड कुटुंबाला ऐनवेळी तिकीट न दिल्यामुळे लोकनेते संजय बंड मित्रपरिवार, तसेच अनेक निष्ठावंत शिवसैनिक नाराज झाल्याने प्रीती बंड यांनी शेकडो शिवसैनिकांना सोबत घेऊन अपक्ष म्हणून प्रचाराला सुरुवात केली आहे. बडनेरा शहरी भागात प्रीती बंड यांच्या ‘जनशक्ती विरुद्ध धनशक्ती’च्या घोषणेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रीती बंड यांच्या प्रचारयात्रेला बडनेरा शिवाजी चौक येथून सुरुवात करण्यात आली आहे, तर आझाद चौक येथे प्रीती बंड यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दरम्यान, त्यांनी ऑटो रिक्षा चालकांशी संवाद साधत माझे निवडणूक चिन्ह ‘ऑटो रिक्षा’ असून आशीर्वाद देण्याची विनंती केली.

 

भातकुली येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन बडनेरा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार प्रीती संजय बंड यांच्या भातकुली तालुका निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रीती बंड यांच्या हस्ते बुधवारी बुध कमर्शियल मार्केट, बसस्टँड भातकुली येथे करण्यात आले. यावेळी मंचावर माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, नाना नागमोते, मनोहर बुध, गटनेत्या सोनाली शिंदे, प्रवीण अळसपुरे, रहेमतखॉ पठाण, मुतल्लीभाई, गप्फारभाई, अज्जुभाई, बशीरभाई, वासुदेव मेश्राम, बद्रीनाथ भोपसे, अनिता पारसे, देवानंद शिरसाठ, गजानन इंगळे, तुषार देशमुख, दीपक गावंडे, गणेश बांबल, डॉ. सुरेश रेहपाडे, प्रल्हाद रेहपाळे, सुरेश सिंह ठाकूर, मो. गुलाम नबी, रहेमत खॉ यावलीकर, गजानन धनवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रीती बंड यांनी बडनेरा मतदारसंघाच्या विकासाचा आराखडा मांडला.

निर्भय बनो, प्रीती बंड चुनो’च्या नाऱ्यांनी भातकुली दुमदुमले भातकुली येथे प्रचार कार्यालयाच्या उ‌द्घाटनाप्रसंगी उपस्थितांनी लोकप्रतिनिधींच्या हुकूमशाही विरोधात एल्गार पुकारत यंदा बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ‘निर्भय बनो, प्रीती बंड चुनो’चा नारा देत परिसर दणाणून सोडला.

Z 24 News
Author: Z 24 News

z24news.dreamhosters.com

और पढ़ें

013589
error: Content is protected !!